Breaking News

मुरूडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर  

मुरूड : प्रतिनिधी

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या मुरूडजवळील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर रविवारी (दि. 26) दोनशे शिवप्रेमींच्या उपस्थित पद्मदुर्ग जागर उत्सव साजरा करण्यात आला. शिवप्रेमींनी रविवारी सकाळी मुरूड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली होती. त्यानंतर बोटीतून ही पालखी पद्मदुर्ग किल्ल्यावर आणण्यात आली. किल्ल्यात प्रथम अर्पिता ठाकूर यांच्या हस्ते कोटेश्वरी मातेचे पूजन करण्यात आले. पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर व शिवप्रेमींच्या हस्ते छत्रपती शिवपुतळ्यावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांची पालखी वाजत गाजत संपूर्ण गडावर फिरविण्यात आली. या वळी खारआंबोली ग्रामस्थ मंडळातर्फे शिवकालीन मर्दानी खेळ तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पद्मदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे तसेच किल्ल्यात येणा-जाण्याकरिता सुसज्ज जेटी उभारावी, अशी मागणी या वेळी आशिलकुमार ठाकू र यांनी केली.  राहुल कासार, संकेत आरकाशी, विजय वाणी, योगेश सुर्वे, महेंद्र मोहिते, महेश साळुंके, अच्युत चव्हाण, रूपेश जामकर, सुनिल शेळके, गणेश सतविडकर, अनिकेत पाटील, नितिन पावले, सुरेश पवार, शेखरमामा फरमन, ज्ञानेश्वर काकडे, रोहित पवार यांच्यासह शिवप्रेमी नागरिक या पद्मदुर्ग जागर उत्सवात सहभागी झाले होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply