अलिबाग : जिमाका
हेलिपॅड उभारण्याकरिता कर्जत तालुक्यातील कडाव येथील जमीन (सर्व्हे नं. 132/1/अ) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. राज्याच्या हेलिपॅड धोरणानुसार सर्व जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलिपॅड तयार करण्यासाठी नियोजन करुन जागा निश्चित करणेबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत तालुक्याकरिता हेलिपॅड उभारण्याकरिता कडाव येथील जमीन (सर्व्हे नं. 132/1/अ क्षेत्र 10.45.00 हे. आर. पैकी 0.80.00 हे.आर.) निश्चीत केली असून, ती जमीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड उभारल्यामुळे नैसर्गिक आपत्ती अगर आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजूंना तातडीची मदत मिळण्याच्या दृष्टीने तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींना घटनास्थळाच्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्यासाठी, यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.