Breaking News

अमेय म्हात्रेने बोरी ते कर्नाळा अंतर दोन तास 25 मिनिटांत केले पार

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील बोरी गावचा सुपुत्र अमेय चंद्रकांत म्हात्रे याने बोरी ते कर्नाळा हे 26 किलोमीटर अंतर दोन तास 25 मिनिटांत धावून पार केले. या उपक्रमात अमेय याला संगम म्हात्रे, प्रणीत मोकल, जितू म्हात्रे, विकी म्हात्रे आदींची साथ लाभली. अमेय म्हात्रे गेल्या काही वर्षांपासून धावण्याचा नियमित सराव करत आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार असून ती स्पर्धा जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे.  अमेय याने बोरी ते अलिबाग हे 26 किलोमीटर अंतर दोन तास 39 मिनिटांत पूर्ण केले होते.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply