Breaking News

कोरोना लसीचा दुसरा डोस देताना बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या; भाजपच्या दीपक शिंदेंची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये पहिला डोस घेतलेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये दुसरा डोस देताना बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, अशी मागणी भाजप खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेलमहापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. लस घेतल्यानंतर काही ना ताप येणे व अंग दुखणे असा त्रास संभवतो. जर येत्या एक दोन दिवसांत कोव्हॅक्सिन लसींची उपलब्धता झाली, तर प्रथम बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. जेणेकरून त्यांना त्रास न होता ते निर्धास्तपणे परीक्षा देऊ शकतील. या निवेदनाची प्रत आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply