Breaking News

‘बेलापूरसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करा’

नवो मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार

नवी मुंबई महापालिका आगामी 2022-23 वर्षाच्या अर्थसंकल्प विकासकामात बेलापूर मतदारसंघात 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बेलापूरच्या मतदारसंघात सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात तसेच प्रलंबित विकासकामांसाठी अर्थसंकल्प मध्ये आर्थिक निधीची तरतूद व्हावी, येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात व मेडिकल कॉलेज निर्माण व्हावे, सीबीडीमध्ये मरिना प्रकल्प, महिला सक्षमीकरण करिता महिला भवन, विद्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी बाल भवन, सानपाडा येथे नियोजित सेंट्रल लायब्ररी, नेरूळ मधील 30 फुटी भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा, खेळाडूंसाठी शूटिंग रेंज प्रशिक्षण, कुस्तीचा आखाडा, भविष्यात मोरबे धरणाची उंची व खोली वाढवणे. यासोबतच नेरूळमधील महात्मा गांधी नगरमधील मुलांना शालेय शिक्षण मिळावे याकरिता बालवाडीची उभारणी, सोलर पार्क उभारणी, बेलापूरच्या विविध ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील घटकासाठी आर्थिक भरीव तरतूद खचर्‍यापासून खतनिर्मिती, प्रकल्पात मुलामुलींना स्वयंरोजगार केंद्र उभारणे, नेरूळमधील सायन्स सेंटर, आपत्कालीन संक्रमण शिबीर उभारणे, तुर्भे रेल्वे स्थानक उड्डाणपूल आदी विकास कामे मार्गी लागावी. यासाठी अर्थसंकल्पमध्ये एक हजार रुपयांची तरतूद करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply