पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि. 1) नगरसचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सादर केला. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) निवडणूक होणार आहे.
या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष शत्रृघ्न काकडे, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अमर पाटील, अजय बहिरा, रामजी बेरा, नगरसेविका सीताताई पाटील, संतोषी तुपे, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, आरती नवघरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.