पेण : प्रतिनिधी
येथील गणपतीचीवाडी येथे अमोद रामचंद्र मुंढे आणि नरेश हिरामण आंबेकर यांच्या जन्मदिनानिमित्त अष्टविनायक मित्र मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पीटल ब्लडबँकचे डॉ. गोसावी व त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलनाचे काम केले. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले.
तसेच मंडळनिरीक्षक प्रकाश मोकल, तलाठी शिवाजी वाबळे आणि आदिवासी समाज संघटनेच्या दाखले वाटप शिबिर घेण्यात आले. त्यात आंबेघर ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील 192 लोकांना जातीचे दाखले देण्यात आले. या वेळी शिरीष मानकवळे, नरेश गायकर, प्रमोद लंबाडे, प्रदिप पाटील, हरेश विर, मंगेश काईनकर, कपिल अविनाश कदम, रमेश आंबेकर, शेखर गायकर, धनंजय गायकर, स्वप्नील बडे, सोनाली बडे, रंजना मुंढे, राहुल पाटील, विजय, राहुल कदम आदींनी शिबिर यशस्वी होण्याठी विशेष परिश्रम घेतले.