Breaking News

महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही

किरीट सोमय्या यांचा पेणमधील पत्रकार परिषदेत इशारा

पेण : प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 18) पेण येथे पत्रकार परिषदेत दिला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी कोर्लई (ता. मुरूड) येथे जात असताना किरीट सोमय्या यांनी पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेच्या तपासासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच करू, त्यासाठी सीबीआय चौकशीची मागणीही करणार असल्याचे सोमय्या सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमधील सुमारे 18 मंत्र्यांचे घोटाळे आतापर्यंत बाहेर काढले असून यातील अनेक जण जेलची हवा खात आहेत. त्यामध्ये अनिल देशमुख यांचा समावेश असून, मंत्री अनिल परब याचा रिसॉर्ट बेकायदेशीर ठरला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा घोटाळा, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाचे कंत्राट रद्द होणे अशी अनेक प्रकरणे मी बाहेर काढली असल्याचे सोमय्या म्हणाले.

पेणमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेच्यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी आदि उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply