Breaking News

कर्जतमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण

कर्जत : प्रतिनिधी

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कोपरा गार्डन संकल्पना राबवली आहे. या माध्यमातून नगर परिषदेने अनेक ठिकाणी स्टॅच्यू उभारले आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 18) संपन्न झाला.

सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला या घटनेला शुक्रवारी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, त्याचे औचित्य साधून कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून उभारलेल्या कोपरा गार्डन, तसेच रस्ते, गटार बांधकामांचे नगराध्यक्षा जोशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या वेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका भारती पालकर, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, नगरसेवक शरद लाड, विवेक दांडेकर, नितिन सावंत, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळींबकर, उमेश गायकवाड, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील तसेच दिपक बेहेरे, भाई गायकर, मोहन ओसवाल, केतन जोशी, संदीप भोईर, गणेश मुंढे, प्रशांत उगले, मंदार मेहेंदळे, मारुती जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply