Breaking News

अत्याधुनिक एसआरएल डायनॉस्टीक सेंटर पनवेलकरांसाठी सोईयुक्त

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः वार्ताहर

अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी शनिवार (दि. 26)पासून सुरू झाले आहे. याच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला हे कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उदघाटनावेळी केले.

उद्घाटन समारंभास नगरसेविका दर्शना भोईर, डॉ. माला झाला, रविकांत झाला, डॉ. निलेश बांठिया, एसएलआरचे अंकित कुमार सिंग, अनिकेत मोहिते, निलेश कोळी, सचिन नाफाडे आदी उपस्थित होते.

डायनॉस्टीक सेंटर हे पनवेल मिडलक्लास हौसिंग सोसायटी, एमटीएनएलसमोर गुरूकृपा अपार्टमेंट येथे शॉप नं. 8, प्लॉट नं. 123वर आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या रक्त तपासणी, त्यामध्ये प्रामुख्याने मलमूत्र तपासणी तसेच इतर तपासणी व चाचण्या माफक दरात केल्या जाणार आहेत. यानिमित्ताने रविवारी (दि. 27) सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन विविध मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. याचा लाभ पनवेलकरांनी घ्यावा, असे आवाहन लॅब डायरेक्टर जसोल सुभाषचंद्र बांठिया (8828882626) यांनी केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply