Breaking News

सिकेटी विद्यालयात बक्षिस वितरण समारंभ

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयाच्या इंग्रजी मध्यमच्या पूर्व प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ शनिवारी झाला. या कार्यक्रमाचे पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यामना नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सिकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमच्या पूर्व प्राथमिक विभागात गांधी जयंत्ती, दिवाळी, बालदिन, प्रजासत्ताकदिनानिमीत्त वेशभुषा, देशभक्तीपर गीत, वकृत्व स्पर्धा आयोजीत केली होती. यास्पर्धेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना शनिवारी विद्यालयात आयोजीत केलेया गुणगौरव सोहळ्यात प्रमाणपत्र आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याच बारोबर दिवाळीमध्ये पालकांसाठी आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत विजयी झालेल्या पालकांना सन्मानीत करण्यात आले. तसेच चिल्ड्रन अ‍ॅकेडमीच्यावतीने आयोजीत रंगभरण, हस्तलेखन स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा या सोहळ्यामध्ये गौरव करण्यात आला.

या वेळी मराठी माध्यमच्या मुख्यध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यमचे मुख्यध्यापक संतोष चव्हाण, पुर्व प्राथमिक विभअगाच्या मुख्याध्यापिका निलीमा शिंदे, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षीका संध्या अय्यर, विद्यार्थी पालक संघाच्या उपाध्यक्षा अनघा भोसले, सभासद उज्वला शिवतरे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply