Breaking News

आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे डिजिटल उपकरणे भेट

नवी मुंबई ः बातमीदार

महाराष्ट्र शासनाच्या पालघर येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी वर्गाला कामकाज करणे सोयीचे व्हावे याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वखर्चातून लॅपटॉप, प्रोजेक्टर व वॉटर फिल्टर वितरीत केले.

या वेळी मत्स्यव्यवसायासह आयुक्त पालव, परवाना अधिकारी  नंदू पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रतिनिधी किशोर नाईक, कैलास कोळी, ज्ञानेश्वर कोळी, प्रणव नाईक तसेच कर्मचारी वर्ग  उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या व्यवहारांमध्ये अधिक सुसूत्रता आणि सहजता आणता यावी या उद्देशाने पालघर मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राला ही उपकरणे देण्यात आली आहे. याबद्दल सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गाने आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply