महाड : प्रतिनिधी
चार राज्यांतील विजयानंतर देशभरात भाजपचा विजयी जल्लोष होत असताना, महाडमध्येदेखील भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुक मिळालेल्या विजयाचा जल्लोष गुरूवारी महाडमध्ये साजरा करण्यात आला. या वेळी ‘युपी ये झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है‘ अशा घोषणा देऊन मोदींचा आणि भाजपचा जयजयकार करण्यात आला. भाजपचे महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, महिला जिल्हा सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती, सरचिटणीस महेश शिंदे, शहराध्यक्ष निलेश तळवटकर, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष नाना पोरे, उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे, अॅड. अदित्य भाटे, सुमीत पवार, राकेश वाघ, अप्पा सोंडकर, तुषार महाजन, विश्वतेज भोसले, सई शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
रोहे : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे रोहा शहरात गुरूवारी सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शहरातील राम मारुती चौकात फटाके फोडत भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, तालुका अध्यक्ष राजेश डाकी, शहर अध्यक्ष यज्ञेश भांड, विपुल शहा, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री भांड, शहर अध्यक्षा ज्योती सुनीलकुमार, सीमा कोनकर, संगिता फाटक, यांच्यासह भाजप कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कर्जत : प्रतिनिधी
चार राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याने कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात फटाके वाजवून व घोषणा देऊन भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी किसान मोर्चाचे सुनील गोगटे, शहराध्यक्ष बळवंत घुमरे, प्रकाश पालकर, संजय कराळे, नागेश जोशी, शर्वरी कांबळे, स्नेहा गोगटे, दिनेश भरकले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.