Breaking News

विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणार्‍या एलएईएस शाळेची मान्यता रद्द करावी

सम्यक विद्यार्थी परिषदेची मागणी

कर्जत : बातमीदार

शाळेची फी न भरल्यामुळे एलएइएस शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणार्‍या नेरळ येथील एलएइएस शाळेवर कारवाई करावी आणि त्यांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

कोविड काळात विद्यार्थ्यांच्या उपस्थिती आणि फीबाबत राज्य शासनाने वेळोवेळी शासकीय आदेश काढले आहेत. विद्यार्थ्याने शाळेची फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परिक्षेस बसण्यास प्रतिबंध करू शकत नाही. तसेच अशा विद्यार्थ्यांचा निकालसुद्धा रोखून ठेवू शकत नाही, असा शासनाचा आदेश असतानादेखील नेरळ येथील एलएइएस शाळेने विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे, असा आरोप पालकांनी केला होता. त्याच्या आधारे सम्यक विद्यार्थी परिषद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जत येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे आणि गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांची भेट घेतली व शिक्षणासंदर्भातील प्रचलित कायदे तसेच शासन आदेशाला जुमानत नसेल तर एलएइएस शाळेची मान्यता रद्द करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अ‍ॅड. कैलाश मोरे यांनी दिला. या वेळी हरिश्चंद्र यादव यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्या शाळेने किंवा प्रशासनाने कधीही दहावीच्या विद्यार्थ्यास ऑफलाइन किंवा ऑनलाईन शैक्षणिक सुविधा नाकारलेली नाही. दहावीच्या कोणत्याही विद्यार्थ्यास येण्यापासून बंदी घातलेली नाही. परंतु शाळेच्या कार्यालयात किंवा प्रशासनास भेट न देता किंवा समक्ष चर्चा न करता काही पालक त्यांच्या पाल्यांचे अहित स्वतः करत असून त्यांनी थेट शाळेसोबत चर्चा करावी. -अजिता नायर, मुख्याध्यापिका, एलएइएस स्कूल, नेरळ

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply