Breaking News

मनसे अध्यक्ष राजेश तरे यांनी मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांची घेतली भेट

मुरूड : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर गेले असून, गुरुवारी पाचव्या दिवशीही त्याचा संप सुरूच आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कर्मचारी सेनेचे अध्यक्ष राजेश ग. तरे यांनी शुक्रवारी आपल्या सहकार्‍यांसमवेत मुरूड आगारातील संपकरी कर्मचार्‍यांची  भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी मंजूर होत नाही, तोपर्यंत तुम्ही हटू नका, आपली मागणी राज्य शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही तरे यांनी या वेळी एसटी कर्मचार्‍यांना दिली. या वेळी तरे यांनी मुरूड आगारातील एसटी कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply