Breaking News

पनवेलमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग; मोठे नुकसान

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली धाव

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहरातील मिरची गल्लीमधील फटाक्याच्या दुकानाला शुक्रवारी  (दि. 11) रात्री 11च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग बाजूला पसरून मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. मिरची गल्ली हा रहदारीचा परिसर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नगरसेवक मुकीद काझी, युवा नेते संजय जैन, पवन सोनी, जवाद काझी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जेव्हा नैसर्गिक संकट येते तेव्हा पनवेलकर एकजुटीने सामोरे जाऊन या संकटाशी दोन हात करतात. शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीचे वृत्त समजताच सर्व पनवेलकर त्या दुकानदारांच्या मदतीसाठी धावून गेले. यातून पनवेलकरांच्या ऐक्याचे दर्शन दिसून आले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply