नवी मुंबई : बातमीदार
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर 13 ते 19 मार्च रोजी सिध्दी करवले येथे आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान स्वच्छता अभियान, श्रमदान, बौद्धिक व्याख्याने, सर्वे, इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े. 13 मार्च रोजी नवी मुंबई लाइन्स क्लबच्या अंकान शहा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. गवळी यांनी सात सात दिवस कोणते उपक्रम राबवणार आहेत यांची माहिती दिली. 14 मार्च रोजी रायगड जिल्हा परिषद शाळेतील कोविडमुळे बंद असलेले काही शाळेचे वर्ग स्वच्छता करून शाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. शाळेच्या परिसरात स्वच्छता करून फुलझाडांची रोपे लावून शाळा सुशोभित करण्यात आली. तिसर्या दिवशी गावातील व मंदीर परिसरात स्वच्छता करण्यात आली. चौथ्या दिवशी ग्रामस्थांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पाचव्या दिवशी वीट भट्टी कामगार आदिवासी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले व तेथील मुलांना वपालकांना शिक्षणासाठी प्रेरित करण्यात आले. तसेच स्वयंसेवकाद्वारे तयार करण्यात आलेले सोलार स्टडी सोलार स्टडी लंप तेथील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले. सहाव्या दिवशी गावाच्या शेजारी मोठा कचरा डेपो असल्यामुळे गावाच्या परिसरातील पाणी आणि माती परीक्षण करण्यात आले. यासोबतच दररोज बौद्धिक विषयांवर व्याख्याने आयोजिली होती. सायंकाळी वादविवाद स्पर्धा व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे दिनचर्य होते. या संस्कार शिबिराच्या समारोप समारंभाच्या वेळी नवी मुंबई महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते व नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष दशरथ भगत यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या समाजसेवेचे समाजसेवेची प्रशंसा केली. यासोबतच समाजसेवेत कार्य करण्यासाठी सर्व परी सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. मनोज महाराणा काही माझी विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षकांनी शिबिरास भेट दिली. सदर शिबिर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शुभदा नायक, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व चेअरमन डॉ. एल. व्ही. गवळी, प्रा. पि. जी. भाले, प्रा. एन. बी.नलावडे, प्रा. अमित सुर्वे व शिबिरार्थी उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिनिधी रोहित मांजरेकर आणि भाग्यश्री रांजणे यांनी दिली.