Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नारीशक्तीचा सन्मान

खारघर ः रामप्रहर वृत्त
भाजपक्ष महिला मोर्चा खारघर तळोजाच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन नुकताच खारघरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक, आध्यात्मिक, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या महिलांचा या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणगौरव व यथोचित सत्कार करण्यात आला. खारघर सेक्टर 4 मधील नगरसेवक शत्रुघ्न काकडे व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था आयोजित आगरी कोळी महोत्सवात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खारघर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक विमल बिडवे, वाहतूक विभागाच्या सहाय्यक निरीक्षक रेश्मा मोमीन, दिपाली राहणे, प्रभाव प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या संचालक अश्विनी शिरोडकर, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी (क्रीडा), डॉ. शुभांगी अदाते (वैद्यकीय सेवा), कांचन पवार (दिव्यांग उद्योजिका), छाया तरळेकर (स्वच्छता अभियान), मंजू चोप्रा (सामाजिक सेवा), साक्षी महाराज धुरावडे (प्रबोधनकार), अनघा मुळे (धार्मिक), ज्योती नाडकर्णी (पर्यावरण), ऋतूजा शेपुंडे (आशा कॉर्डिनेटर) या महिलांचा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभाला पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका नेत्रा पाटील, आरती नवघरे, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, अमर उपाध्याय, प्रशांत दुडम, नमो नमो प्रदेश अध्यक्ष संतोष शर्मा, अशोक पवार, भरत काकडे, नामदेव म्हात्रे, संजय मुळीक, महिला मोर्चा उत्तर रायगड उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, चिटणीस गीता चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका मोना अडवाणी, मंडल उपाध्यक्ष बिना गोगरी, चिटणीस अनिता जाधव, संजना काकडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर नृत्य व गायन सादर केले. या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍यांपैकी सात भाग्यवंत महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, सरचिटणीस साधना पवार यांनी विशेष मेहनत घेतली. शिवाय उपाध्यक्ष आशा बोरसे यांच्या तळोजातील महिलांनी विविध नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली, तर उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, चिटणीस मधुमिता जेना, अंकिता वारंग, खजिनदार सुमित्रा चव्हाण, राजश्री नायडू, स्मिता आचार्य, श्यामला सुरेश, उमेरा खान, सीमा खडकर, आशा शेडगे, निलम विसपुते, निर्मला यादव, अनुसूचित जाती जिल्हा सदस्य सीमा खडसे, अश्विनी भुवड, शोभा मिश्रा, प्रिया दळवी, नीता गोगरी, वैशाली प्रजापती, विजया ठाकूर, विजया पाटील, शारदा भोसले, विजयालक्ष्मी सरकार, सुनीता मुळीक, निती तळेकर यांचेही कार्यक्रमास सहकार्य लाभले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply