पनवेल : बातमीदार
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलानाच्या कार्यक्रमानंतर नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) देऊन सन्मान केला.
पोलीस विभागात कर्तव्यावर असताना सन 2018 या वर्षामध्ये उत्तम कामगिरी बजावणार्या पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना पोलीस महासंचालकांचे पदक घोषित केले जाते. या वर्षी नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांची पोलीस महासंचालक पदकासाठी निवड झाली होती. बुधवारी सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयात आयोजित पथसंचलाच्या कार्यक्रमानंतर पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांचा पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात आला.
यात जिल्हा जात पडताळणी विभागाच्या उपअधीक्षक संगीता शिंदे अल्फान्सो, सहाय्यक पोलीस आयुक्त पुष्पलता दिघे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब झेंडे, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार गजानन ठाकूर, अरुण भिलारे, दीपक पाटील, प्रवीण बाबा, सुरेश गायकवाड, हेमंत सूर्यवंशी, सीमा यादव, बापू काकडे, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक बारकू सोनवणे, उपनिरीक्षक अरुण वाघ यांचा समावेश आहे. त्यापैकी संगीता शिंदे व पुष्पलता दिघे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून बदली झालेली आहे.