Breaking News

पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला

पनवेल ः प्रतिनिधी

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही या निकालाच मुलींनीच बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून पहिला आलेला शशांक नाग हा नवीन पनवेलमधील डीएव्ही शाळेतील विद्यार्थी आहे. त्याला इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. 

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डाने लवकर परीक्षा घेतल्या होत्या. यानंतर अवघ्या 28 दिवसांमध्ये परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के इतके आहे. यंदा 10 विभागांत सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply