उरण ः रामप्रहर वृत्त
आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया मयूर घरत यांना सरपंच सम्राट पुरस्कार 2022ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया मयूर घरत यांनी ग्रामपंचायतीमध्ये विविध कामे करीत गावाचा विकास साधला आहे. त्याचबरोबर कोरोना काळात जनजागृती, अन्नधान्य वाटप, लसीकरण मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यामुळे त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.