Breaking News

नवीन कोर्टसमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

पनवेल ः वार्ताहर

अमरधाम ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्णत्वाकडे आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे नवीन कोर्टकडे जाणार्‍या रस्त्याला उतार जास्त होता. तात्पुरता उपाय म्हणून दगड आणि माती टाकून रस्त्याला उतार देण्यात आला होता, पण रस्त्याची स्थिती खराब झाली होती. याबाबत माहिती स्थानिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली. त्यांनी तातडीने महापालिका अधिकारी आणि ठेकेदाराशी चर्चा करून हा विषय निकाली काढला. स्वतः जातीने उभे राहून रस्त्याचे काम व्यवस्थित होत आहे नाही याकडे लक्ष देऊन होते. प्रभागातील समस्या सोडवण्यास नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. समस्येचे निरसन लवकरात लवकर करण्याकडे ते स्वतः जातीने लक्ष देत असतात. त्याबद्दल नागरिकांनी आणि स्थानिक रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावरील पथदिवे लावण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply