Breaking News

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पनवेल मनपात शीघ्र कृतिदल

पनवेल ः वार्ताहर

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पनवेल महापालिकेत शीघ्र कृतिदलाची स्थापना करण्यात आली असून, कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे, तसेच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स सभेत देण्यात आलेल्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी शीघ्र कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील ट्रॅव्हल्स एजन्सींना परदेशात जाणार्‍या सहली रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका हद्दीतील जे नागरिक आता बाहेरगावी गेले आहेत त्यांची माहिती घेऊन ते परतल्यावर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यावर त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. मॉल, हॉटेल, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा या ठिकाणी स्वच्छतेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका हद्दीतील एमजीएम रुग्णालय कामोठे, पनवेल येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. खासगी डॉक्टरांना स्वयंसेवा तत्त्वावर रुग्णालयीन सेवा पुरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. कर्मचार्‍यांना याबाबतचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. श्वसन संस्थेचे आजार असणार्‍या व्यक्तीशी निकटचा सहवास टाळावा, हात वारंवार धुणे व नियमित स्वच्छता ठेवणे, शिंकताना, खोकताना, नाका-तोंडावर रुमाल अथवा टीश्यू पेपरचा वापर करणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मास खाऊ नये, फळे, भाज्या न धुता खाऊ नये, आवश्यकता वाटल्यास नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनवर  निशुल्क कॉल करावा, टोल फ्री क्रमांक  1800222309/2310 किंवा 022-27458040/41 विस्तारित क्रमांक 1012/14 असा आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply