Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील टेंभोडे येथे ओपन जिम

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत असून नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्या अंतर्गत टेंभोडे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 12) झाले.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मधे, आसुडगावचे माजी सरपंच शशिकांत शेळके, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अशोक गडगे, सचिन चौधरी, सुभाष भोईर, राघो कडव, संतोष भोईर, महिला मोर्चा तालुका चिटणीस प्रतिभा भोईर, मारूती चिखलेकर, संदीप भोईर, निवृत्ती भोईर, ललिता भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वळवलीत रस्ता कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार असल्याने हे गाव सुंदर आणि आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 12) केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीत विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्या अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून वळवली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पनवेल महापालिका हद्दीत भाजपच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे सुरू होत आहेत. त्यानुसार वळवली गावात महापालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मधे, माजी सरपंच शशिकांत शेळके, भाजप नेते कृष्णा चौधरी, वॉर्ड अध्यक्ष सचिन चौधरी, मारूती चिखलेकर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, कृष्णा पालेकर, गोवर्धन पाटील, अनंत भोईर, विजय भगत, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, हरिश्चंद्र पाटील, हरिश्चंद्र चौधरी, रूपेश म्हात्रे, कचेर भोईर, माजी उपसरपंच दीपक पाटील, जगदिश उगडा, चंद्रकांत पारधी, गुरूनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply