पनवेल : वार्ताहर
डॉक्टर्स डेचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेतर्फे डॉक्टररुपी देवदूतांना वनौषधी रोपे व सन्मानपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
आर्या वनौषधींच्या या कार्यक्रमास एकता आवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम येलवे, आर्या पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना केवडा, निरब्राम्ही, चिरायता, वेखंड आदी वनौषधी रोपे व सन्मानपत्रे देण्यात आली.
कोरोना काळात डॉक्टरांना देवाचे रूप मानले गेले. अनेक रुग्णांसाठी तर डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत वाटला. कोरोना काळात या देवदूतांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. अशा या डॉक्टररुपी देवदूतांच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे संस्थेचे अध्यक्ष व ‘आर्या प्रहर’चे संपादक सुधीर पाटील यांनी या वेळी सांगितले.