Breaking News

युनिफाइड आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट इव्हेंट

पनवेल : वार्ताहर

राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई संस्थेकडून जागतिक स्वमग्न दिवस साजरा केला जात आहे.  स्वमग्न जागरूकता सप्ताहाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबईद्वारे युनिफाइड आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट इव्हेंट आयोजित केला होता. बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांग (दिव्यांगजन) मुलांनी त्यांच्या पालकांसह सहभाग घेतला.

या वेळी मोठ्या संख्येने विशेष मुले, पालक, प्रशिक्षणार्थी, संस्थेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे व्याख्यता ज्योती खरात, डी. सावंत, विशेष शिक्षक शर्मिश्ठा घोष, गायत्री कवडे, सुरेश बेडके, संतोष शेलार यांनी केले. संपुर्ण कार्यक्रम डॉ. रवी प्रकाश सिंह संस्थेचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply