Breaking News

खारघरमध्ये विविध खेळांसह रक्तदान शिबिर

नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 8) विविध उपक्रम राबवून साजरा झाला. त्यानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या वतीने खेळांचा महासंग्राम आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते यांनी भेट देऊन प्रवीण पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पनवेल महापालिकेचे खारघर येथील नगरसेवक प्रविण पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध खेळांचे आणि भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 21 येथील सचिन तेंडुलकर मैदानात कबड्डी, व्हॉलिबॉल आणि बॅडमिंटन खेळाचे आयोजन केले होते. या खेळांच्या महासंग्रामाचा आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला तसेच सेक्टर 21 मधील भवानी मंदिरामध्ये श्री साई ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदा शिबीर आयोजीत करण्यात आले असून शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मान करण्यात आला. भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, नगरसेवक रामजी बेरा, समीर कदम, शुभ पाटील, भीमराव लोंढे, पप्पु खामकर आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply