Breaking News

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून दुसर्‍या डोसला नऊ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे ते कोरोनाचा प्रतिबंधात्मक बूस्टर डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
याआधी केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतीक्षा होती. ती संपली.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply