Breaking News

पनवेलकरांच्या सेवेसाठी आधुनिक यंत्रणा

गांधी हॉस्पिटलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल ः वार्ताहर

पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एमआरआय व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सीटी स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी फीत कापून केले.

या लोकार्पण सोहळ्याला पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, संजय जैन, गांधी हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद गांधी, यांसह अनेक डॉक्टर्स, नागरिक उपस्थित होते.

या ठिकाणी विविध प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अजूरिऑन कॅथलॅबची वैशिष्ट्य म्हणजे हार्ट अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंट बूस्ट लाईव्ह, कार्डियाक स्विंग, डायनामिक करोनरी रोड मॅप, ब्रेन डीएसए स्टेन्टिग, कॉइलिंग पेरिफेरल अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी मोस्ट अ‍ॅडव्हान्सड कॅथलॅब इन नवी मुंबई लोएस्ट रेडिएशन एक्सपोजर असणार आहे. तर डिजीटल फिलिप्स एमआरआयची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण बॉडी एमआरआय, न्यूरो इमेजिंग, पेट्स एमआरआय, मेटल आर्टिफॅक्ट रिडक्शन एमआरआय, एमआरआय ब्रेस्ट मॅमोग्राफी, कार्डियाक एमआरआय, मुस्क्युलोस्केलेटल एमआरआय, औंको एमआरआय, रिनल इनसफिशियन्सी पेशंट फ्रेंडली एमआरआय, कमीत कमी एकॉस्टिक साउंड, डिजीटल क्लरिटी, फास्ट एमआरआय आहे. तसेच तोशीबा कॅनॉन सीटी स्कॅनची वैशिष्ट्ये ही 32 स्लाईस, मेटल आटिफॅक्ट रिडक्शन सिक्किन्स, सीटी गायडेड बायोप्सी, लंग व्हॉल्यूम अ‍ॅनालिसिस, आयोडिन मॅपिंग, व्हर्च्युअल एन्डोस्कोपी अशी असणार असून आता गांधी हॉस्पिटलची हार्ट केअरसोबत नवी ओळख निर्माण झाली आहे.

यासाठी कॅथलॅब टीम म्हणून डॉ. अविनाश गुठे, डॉ. ऋषीकेश ठाकूर, डॉ. सागर तांडेल, डॉ. केशव काळे, डॉ. अनुज साठे, डॉ. मुग्धा ठाकूर तर ब्रेन डीएसए टीम म्हणून डॉ. नीरज पटनी, डॉ. किशोर जाधव, डॉ. जयेंद्र यादव, डॉ. समीर काळे तसेच एमआरआय व सीटी स्कॅन टीम म्हणून डॉ. प्रतीक पाटील, डॉ. सुशील पाटील, डॉ. अक्षय गुरसाळे हे काम पाहणार आहेत.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply