Breaking News

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे सामाजिक कार्य आदर्शवत- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी

एक एक दिवसाने आपण वाढतोय. या वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आपल्याला काही आणखी तरी अनुभवावे ही जी भावना आहे, ती फार कमी जणांमध्ये असते. त्याच पद्धतीने जगलेल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराची व समाजाबद्दल कृतज्ञतेची भावना असावी व त्या भावनेपोटी समाजाला देण्याचा प्रयत्न करावा करणारी फार कमी माणसे असतात. अ‍ॅड. मनोज भुजबळ हे त्यापैकी एक असून त्यांचे सामाजिक कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोज भुजबळ यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष कला व क्रीडामंडळाने रविवारी (दि.10) विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’ सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, नगरसेविका राजश्री वावेकर, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, विजय म्हात्रे, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा वर्षा नाईक, भाजपनेते रवी नाईक, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, विनोद वाघमारे, यतीन पाटील, प्रतिभा भोईर, प्रशांत फुलपगारे, प्रमोद भगत, दीपेश भगत व प्रभाग अध्यक्ष म्हात्रे उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महापालिका वेगवेगळ्या सेवा पुरवण्याचा प्रयत्न करीत असताना मनोज भुजबळ यांनी तेवढ्यावरच न थांबता उत्कर्ष कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याने कौतुक केले. महापालिकेकडून सुविधा हव्या असतील, तर कर भरणे आवश्यक असल्याचे सांगून तो कसा कमी आहे याची माहिती दिली. अमृत योजनेची माहिती देऊन त्याचा फायदा दोन अडीच वर्षांनी होऊन आपली पाण्याची गरज पूर्ण होईल. पण तोपर्यंत सिडकोला जागे केल्याशिवाय हालत नाही, म्हणून मटका फोड आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

या वेळी मनोज भुजबळ यांनी आम्ही चार नगरसेवकांनी निवडणुकीत दिलेली 90 टक्के आश्वासने पूर्ण केल्याचे सांगितले. वडिलधारे लोकनेते रामशेठ आणि आपले दोघांचे सहकार्य असल्यानेच हे शक्य झाल्याचे सांगितले. यानंतर ई-श्रम कार्डचे व गुढीपाडवा शोभायात्रेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply