70 टक्के बससेवा सुरू
माणगाव : प्रतिनिधी
आपल्या मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते . माणगाव बस आगारातील सुमारे 82 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हे कर्मचारी टप्याटप्याने कामावर हजर होऊ लागल्याने माणगाव एसटी आगाराची सत्तर टक्के सेवा सुरु झाली आहे.
संपापूर्वी माणगाव एसटी आगाराच्या लोकल व लांबपल्याच्या अशा दरदिवशी 222 फेर्या चालत होत्या. संपावर गेलेल्या 82 पैकी 44 कर्मचारी सध्या कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे माणगाव आगारातून 170 फेर्या सुरु झाल्या आहेत. उर्वरित 38 कर्मचारी कामावर हजर होणे बाकी असून ते येत्या आठवड्यात टप्याटप्यांनी हजर होतील. तेव्हा पूर्ण क्षमतेने बस आगार सुरु होणार आहे.
माणगाव आगारातून सध्या पुनाडेवाडी, उसर तळेगाव, कोरखंडा, गौळवाडी, तोराडी येथे वस्तीच्या गाड्या तर तळा, निजामपूर, केळगण, म्हसळा, गोरेगाव, घरोशी आदि ग्रामीण भागातील बस फेर्या सुरु झाल्या आहेत.
डिसेंबरपासून माणगाव आगाराच्या थोड्याफार प्रमाणात बस फेर्या सुरु होत्या. त्यानंतर 8 ते 19 एप्रिल या कालावधीत टप्याटप्याने कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे 70 टक्क्याहून अधिक एसटी वाहतूक सुरु झाली आहे.
-चेतन देवधर, व्यवस्थापक, माणगाव एसटी आगार