Breaking News

माथेरानमधील व्यावसायिक घेणार ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर’चा लाभ

कर्जत : बातमीदार

माथेरानमध्ये फुटपाथवर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचा पथविक्रेते म्हणून समावेश करण्यात आला आहे. पदपथावर व्यवसाय करणार्‍यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजना जाहीर करण्यात आल्यानंतर या व्यावसायिकांचा नगरपरिषद कर्मचार्‍यांकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्या अहवालावरून नगरपरिषदे मार्फत संबंधित योजनेचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले होते. ज्या व्यावसायिकांनी या योजनेमधील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती, अशा पथविक्रेत्यांना पात्र असल्याच्या संमती पत्राचे नगरपरिषद कार्यालयात वाटप करण्यात आले. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेसाठी माथेरान शहरातील 20 पथविक्रेत्यांचे अर्ज पाठविण्यात आले होते, त्यापैकी 17 अर्ज ग्राह्य धरण्यात आले. या 17 लाभार्थींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज युनियन बँकेच्या माथेरान शाखेतून वितरित केले जाणार आहे. त्याबाबतची संमतीपत्रे नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक संदीप कदम, कीर्ती मोरे, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक उत्तम बनसोडे, कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे, वरिष्ठ लिपिक नरेंद्र धनावडे, चर्मकार समाज अध्यक्ष सूर्यकांत कारंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

संमतीपत्र दिल्यानंतर दहा हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. हे कर्ज एक वर्षात फेडल्यास व त्यावरील व्याज वेळेवर भरल्यास बँकेकडून व्याजामध्ये सूट दिली जाईल.

-उत्तम बनसोडे, शाखा व्यवस्थापक, युनियन बँक माथेरान

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply