विंचूदंश प्रतीलसीचे संशोधनाचे श्रेय हाफकीन इन्स्टिट्यूट आणि हाफकीनच्या संशोधकांचे आहे. हे संशोधन संपूर्ण मानजातीसाठी उपयुक्त असल्याचे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी म्हटले आहे. डॉ. बावस्कर यांनी विंचूदंशावरील प्रतिलस संशोधनाव्यतिरिक्त फॉरॉन्सिक्युया डायग्नोस केला आहे. 1976 साली महाड कोकणात आल्यानंतर विंचूदंश रुग्णांवर उपचार सुरू केले, मात्र मृत्यूचे प्रमाण 30 टक्के एवढे चिंताजनक होते. त्यामुळे संशोधन करण्याची गरज भासली. विविध उपचार प्रयोग करून विंचूदंश झालेले रुग्ण वाचविण्याचा प्रयत्न केला. कोणतीही उपचारपद्धती व साधनसामुग्री निदान आणि वैद्यकीय साहाय्यासाठी उपलब्ध नसताना प्रयत्न सुरू होते. अशातच 1987 साली ‘प्रादूशिनी’ नावाचे औषध उपलब्ध झाले. त्याचा वापर करणारा मी जगातील पहिलाच डॉक्टर होतो. याचा मी त्या वेळी लॅन्सेंट वैद्यकीय नियतकालीकामध्ये उल्लेख केला होता. तेव्हा कोणतीही लस अथवा प्रतिलस अस्तित्वात नव्हती. प्रादुशिनीचा वापर करून विंचूदंश रुग्णांच्या दगावण्याचे प्रमाण 30 टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत आणले. यासाठी अनेक डॉक्टर सहकार्यांना प्रशिक्षित केले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्यात आम्हाला यश आले. मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने डॉक्टर मंडळीही खुश होती. यासाठीच मी प्रतिलस अथवा लस शोधण्यासाठी विरोध करीत होतो. आता प्रादुशिनी हे औषध उपलब्ध असून योग्य उपाय करीत होते. लस तयार करायची झाल्यास विंचू शोधून आणावे, विष संकलित करायचे, घोडा आणि खेचरांवर विषाची मात्रा देऊन त्यांच्या रक्ताचे नमूने संकलित लस किंवा प्रतिलशीची निर्मिती करायची यासाठी लॅबोरेटरी आणि सायन्टीस्टपासून मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच मनुष्यबळ उभे करावे लागल्यास प्रभावी प्रादुशिनी हे औषध उपलब्ध असताना तयार होणारी लस अथवा प्रतिलस खर्चिक होऊन विंचूदंश रूग्णास परवडणारी नसेल या हेतूने मी सुरुवातीला विरोध केला असल्याचे त्यांनी मान्य केले. जेव्हा 1997मध्ये प्रतिलस आणली तेव्हा डॉ. विवेक नातू आणि सहकार्यांनी व्ही. एस. मेडिकल कॉलेजमध्ये ट्रायल सुरू केली आणि प्रतिलस उपलब्ध झाल्याचे जाहीर केले. हे त्यांचेच यश आहे. 2011मध्ये संशोधनादरम्यान मी विंचूदंश रूग्णांना प्रादुशिनीसोबतच या प्रतिलशीचाही वापर केला असता निरिक्षणांती रुग्ण वेगाने बरे होण्यास प्रतिलस उपयुक्त असल्याचे आढळून आले. विज्ञानामध्ये परिवर्तनशीलता असते. नवनवीन शोध लागत असतात. पूर्वीची मते बदलत असतात नवीन मते काही काळ रूढ राहून कालांतराने तीदेखील बदलतात ही प्रक्रिया सुरू असते. प्रादुशिनी आणि प्रतिलशीच्या एकाचवेळी सोबत वापराने मृत्यूदर झपाट्याने कमी झाल्याने 2010 मध्ये डॉ. विवेक नातू यांनी जे आर्टिकल लिहिले त्याचा संदर्भ देऊन मी प्रादुशिनी व प्रतिलस यांचा सोबत वापर करून केलेल्या उपचाराबाबतच्या माझ्या विषयामध्ये डॉ. नातू यांना प्रतिलससंदर्भात स्पष्टपणे क्रेडीट दिले आहे, असेही डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितले आहे. पद्मश्री पुरस्कार कमिटी देत असते. त्यासाठी वैद्यकीय जीवनातील विविध योगदानाचा विचार केला जात असतो. केवळ विंचूदंश उपचार पद्धतीसाठी पद्मश्री पुरस्कार नसून डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाद्वारे मानवसेवा केल्यासाठी आहे. यामध्ये विंचूदंशापाठोपाठ सर्पदंशदेखील 30 टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याखेरिज फॉरॉन्सिक्युया डायग्नोस केला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील तरुण शेतकर्यांमध्ये होणार्या किडनी फेल्युअरवर संशोधन करून सूचविलेल्या उपायांमुळे सरकारला तेथे भूजल देण्याऐवजी जमिनीवरील जलस्त्रोत निर्माण करून त्यांचे शुद्धीकरण करावे लागले. सुमारे 60 तरुण शेतकर्यांना तसेच माती, पाणी व दगडांचाही अभ्यास करून कॅडमियम आणि लेड यांचे प्रमाण अधिक असल्याने शरीरामध्ये या पाण्याद्वारे किडनी हा अवयव निकामी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात अमेरिकेमध्ये संशोधनपर लेख प्रसिद्ध झाल्याने शासनाला याची दखल घ्यावी लागली. अल्झायमर्ससारखा स्मृतीभ्रंश सदृश्य आजार समजून येण्यासाठी न्यूरोसर्जनकडे जाण्याआधीच रूग्ण उपचार करण्यापलीकडील अवस्थेत पोहोचला असतो. याबाबतदेखील डॉ. हिम्मतराव बावस्कर संशोधन करून उपाययोजना सूचविल्या. थॉयरॉईडबाबत संशोधन करून आयोडीन मीठामुळे हा आजार बळावत असल्याचेही डॉ. बावसकर यांनी सिद्ध केले आहे. बी-12बाबत केलेल्या संशोधनामध्ये पूर्ण शिजविलेल्या भाज्या आणि मांसाहारामधून बी-12 नष्ट होत असून गोळयांद्वारे बी-12 दिल्यास ते पुरेसे नसते. इन्टेस्टाईनमध्ये बी-12ची निर्मिती होत असून आदिवासी लोकं कच्च्या भाज्या, कंदमुळे तसेच भाजून कमी शिजलेल्या खेकडे व मासळीचा आहार करीत असल्याने बी-12 मुबलक प्रमाणात शरीरात निर्माण होत असते. नागरी जीवनात माणसांच्या शरीरामध्ये बी-12च्या निर्मितीसाठी आम्ही दही खाण्याचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला देत असतो हा शोध आम्ही लावला आहे, असेही डॉ. हिम्मतराव बावसकर यांनी स्पष्ट केले आहे. ज्या माणसांच्या कानावर पट्टी आली अशांना हार्ट डिसीज लवकर होत असल्याचे संशोधन करून त्यास लवकरात लवकर उपचार करण्याची संधी मिळू शकते. जगातील एकूण 347 पब्लिकेशनपैकी 108 पब्लिकेशन गुगलवर डॉ. हिम्मतराव बावस्कर नावावर ऑथोराईज आहेत. मण्यार नावाचा साप रात्री घरात दबा धरून बसतो. त्याचे दात लहान असतात व तो चाटून जातो असे म्हणतात. त्याच्या दंशावर उपचार करण्यासाठी तो साप चावल्याचे निदान करण्याची आवश्यकता असते; अन्यथा अन्य आजारांची लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. या संदर्भात आपण असंख्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले असल्याने रुग्णांच्या भागातच तातडीने वैद्यकीय उपचार करणारी डॉक्टर मंडळी उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती डॉ. हिम्मतराव बावसकर यांनी दिली.
-शैलेश पालकर