Breaking News

यूईएस कॉलेजमध्ये ‘एनएसएस’चे द्वितीय शिबिर

उरण : वार्ताहर

युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या द्वितीय शिबिराचे आयोजन दि. 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले होते. 17 विद्यार्थ्यांच्या शिबिराची सुरुवात करताना, विद्यार्थ्यांचे तीन ग्रुप तयार करुन सर्व कामे त्यांना वाटून देण्यात आली. योगासने, टास्क, श्रमदानाचे महत्व, मैदानी खेळ, बुद्धिला चालना देणारे बौद्धिक खेळ, वादविवाद स्पर्धा, कविता रचणे असे विविध प्रकार विदयार्थ्यांना हाताळायला दिले. देश निर्माण करण्यासाठी युवकांचे हवे असलेले योगदान या विषयावर प्रभारी प्राचार्य गिरीश कुडव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. तर आत्मविश्वास कसा वाढवावा या विषयावर संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांनी आपले विचार मांडले. तसेच माजी अध्यक्ष व सदस्य अ‍ॅड. राजेंद्र भानुशाली यांनी स्त्रियांसंबधित कायदे या विषयावर आपले विचार व्यक्त केले. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका दीपाली पाटील यांनी पथनाट्य या विषयावर मार्गदर्शन केले. तर नैतिक मूल्ये या विषयावर हिंदीच्या ज्येष्ठ शिक्षिका हृद्येश गौर तसेच माजी प्राचार्या व सदस्या स्नेहल प्रधान यांनी आपले मौलिक विचार मांडले. राजेश्वरी कोरी, डेप्युटी कंट्रोलर सिव्हिल डिफेन्स, उरण यांनीसुद्धा स्वच्छतेकडून आपत्ती व्यवस्थापनेकडे या विषयावर आपले विचार मांडले. सात दिवस चाललेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या अंगात शिस्त निर्माण होऊन, जीवनाकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अजून सकारात्मक झाल्याचे पाहण्यात आले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply