पनवेल : रामप्रहर वृत्त – चतुरंग निर्माण प्रतिष्ठानने पनवेल चेस असोसियशनच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 13 सप्टेंबर रोजी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा विनाशुल्क आयोजित करून बुद्धिबळ स्पर्धकाना कोरोंना काळात अनोखी संधी प्राप्त करून दिली. स्पर्धेत देशभरातील 64 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आली सात फेर्यांमधील सातही ाव जिंकून पारस भोईर पनवेल वय 11 वर्ष यांने अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या.ओरिसा येथील बुद्धिबळ प्रशिक्षक आदित्य पटनायक याने सहा गुणांसह द्वितीय क्रमांक तर आलिबागच्या सुरेश गोबे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे नियोजक चतुरंग निर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी केले. ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेसाठी श्रेया पाटील ह्यांनी नियोजन तसेच संगणक पंच म्हणून काम केले. पनवेल चेस असोसियशनच्या दहावा वर्धापन दिनी अनोख्या पद्धतीने ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा तसेच कोरोना काळात बुद्धिबळप्रेमींसाठी नवीन उपक्रम राबवणार्या चतुरंग निर्माण प्रतिष्ठानचे कौतुक पनवेल चेस असोसियशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर यांनी केले.
तसेच पनवेल चेस असोसियशनचे ध्येय बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार असून कोरोनाकाळ संपल्यावर मुलांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा पनवेलमध्ये घेण्याचे सुतोवाच केले.