राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने अनाथ झालेल्या महाडला कोणी वालीच उरलेला नाही. ऐतिहासिक परंपरा, सामाजिक वारसा लाभलेला महाड तालुका दिवसेंदिवस दरिद्री आणि मागास होऊ लागला आहे. विकास पुर्णपणे खुंटला आहे तर प्रगतीच्या वाटा बंद झाल्या आहेत. एवढे थोडेके म्हणून की काय, नैसर्गिक संकटाने इथला नागरीक पुरता बेजार झाला आहे. ठेवीले अनंते तैसेचि रहावे या युक्तीप्रमाने महाडचे दिवस चाचले आहेत.
महाड तालुका, पुर्वी काळचा कोकणातला महत्वाचा तातुका. कोकणातुन येतान चिपळूण महाड आणि थेट मुंबई अशी थांबण्याची ठिकणे होती. एसटीचा हा महत्वाचा थांबा होता. त्यावेळी महाड आगाराच वैभवच काही वेगळ होत. बस आणि प्रवाशांसाठी प्रशस्त जागा, चांगल्या सुविधा, कँनटीनच चवदार जेवण, त्या काळातल कोकणातल अत्याधुनिक वर्कशॉप, सुलभ सौचालय, वाहक चालकांसाठी उत्तम विश्राम व्यवस्था, मुबलक पाणी, स्वच्छता, त्यातच महाड बसस्थानक हे महाडच प्रवेशद्वारच होत त्यामुळे महामार्गावरुन प्रवास करणार्यांना महाड बसस्थानकाची प्रशस्त आणि सुंदर इमारत दिसताच महाड आल्याची जाणीव होत असे. महत्वाच म्हणजे एसटीच्या याच रस्त्याने इतर वाहने शहरात प्रवेश करत असत आणि तोच एकमेव शहरात प्रवेश करण्याचा मार्ग होता. भले तो एसटीच्या मालकीचा असला तरी तसा विषय किंवा वाद कधीच पुढे आला नव्हता. महाडची ओळख असणार एसटी स्टँड ही ओळख हरवू लागल आहे. या साठी आम्ही महाडकरच जबाबदार आहोत. महाडच्या विकासाचा आणि प्रगतीचा कोणताच अजेंडा कोणाकडेच नाही.
महाड महामार्गावरुन महाड बस स्थानक आणि महाड शहरात प्रवेशकरणार्या मार्गाची आज दयनीय अवस्था आहे. अस्तित्वात नसलेल्या या मार्गात चिखल आणि दगड गोठे आहेत. वाहने या खड्यांमध्ये अडकत आहेत तर मोटार सायकल स्वारानना मोठी कसरत करावी लागते. महिला तर या मार्गाने स्कुटी घेऊन जाण्याची हिम्मात करत नाहीत. केवळ दोनशे अडीचशे मिटर लांबी असलेल्या या रस्त्याचे काम ना तर एसटी करत आहे, ना नगरपालिका कर आहे. हा रस्ता आमच्या मालकीचा नाही म्हणून पालीका हात वर कलत आहे तर फक्त एसटीच्या बस साठी असणार्या या मार्गावल बस ऐवजी इतर वाहने जास्त असतात त्यामुळे आम्ही याच काम का कराव ? असा प्रश्न एसटी प्रशासनाचा असतो. हा मार्ग भले कोणाच्याही मालकीचा असो किंवा नसो, नियोजन किंवा स्थानिक आमदारांच्या विकास निधीमधुन या रस्त्याचे काम होऊ शकते. महाड नगरपालिकेच्या डीपी मध्ये महाड बसस्थानकाच्या बाजूने रस्त्याची तरतूद आहे. मात्र या ठिकाणी बांधण्यात आलेली बेकादेशीर बांधकामे व अतिक्रमण हटविण्याची हिंमत महाड नगरपालिकेच्या व्यवस्थापनात नाही. नगर पालीकेचा हा विस फुटी मार्गाचे जर काम झाले तर खर्या अर्थाने महाड करांसाठी सुखकर होणार आहे. या साठी राजकीय इच्छाशक्ती हवी व त्यासाठी स्थानिक आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि असे होणार नसेल तर महाडच्या नागरिकांनी आता आंदोलनाची भुमीका घ्यावी.
हीच अवस्था महाड आगाराच्या वर्कशॉपची आहे. स्पेअर पार्ट अभावी गाड्या मोठ्याप्रमाणात नादुरुस्त होत आहेत तर इंधन मिळत नसल्याने बसना खाजगी पेट्रोल पंपावर जावे लागत आहे, व याठी प्रवाशांना प्रवासात नाहक वाढीव आर्धी तासाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वतः ला कोकणाचे पालक म्हणविणार्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे. महाड बस स्थानावरील शौचालयाची तर दयनीय अवस्था आहे. महिलांना या शौचालयात जाण्यासाठी अंगावर काटा येत आहे, गैर सोय होत असल्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.
-महेश शिंदे, खबरबात