Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या विकासनिधीतून मिळाली सुसज्ज रुग्णवाहिका

पालीत लोकार्पण सोहळा, नागरिकांना मिळणार मोफत सेवा

पाली : रामप्रहर वृत्त

आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून सुधागड तालुक्याला एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी (दि. 16) आमदार पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भाजपचे सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, तालुका युवामोर्चा अध्यक्ष व सरपंच रोहन दगडे, आपटवणे सरपंच शरद चोरगे, मारूती देवरे, नगरसेवक गणेश सावंत, नगरसेविका जुईली ठोंबरे, सुरेश ठोंबरे, शिरीष सकपाळ, प्रकाश ठोंबरे, राजेंद्र गांधी, गणपत दळवी, केतन देसाई, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, डॉ. सायली मानकर, डॉ. नंदकुमार मुळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधागड तालुक्याला रुग्णवाहिका मिळविण्यासाठी  गटविकास अधिकारी विजय यादव व आरोग्य अधिकारी शशिकांत मढवी यांनी विशेष प्रयत्न केले.

सुधागड हा आदिवासीबहुल तालुका आहे. येथील आदिवासी बांधवांना तसेच गोरगरीब लोकांना या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे. रुग्णवाहिका सेवा सर्वांसाठी मोफत आहे. याशिवाय तालुक्यासाठी जास्तीत जास्त योजना व विकास कामे कशी होतील याकडे लक्ष देत आहे.

-रविशेठ पाटील, आमदार, सुधागड- पेण-रोहा-मतदार संघ

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply