मुरूड : संजय करड
मुरूड समुद्र किनारी आता डुएट सायकली आणण्यात आल्या आहेत. या सायकलवर दोन व्यक्ती विराजमान होऊन अगदी सहज रपेट मारू शकतात. सध्या या डुएट सायकली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
एकदरा येथील चंद्रकांत शांताराम पवार यांनी डुएट सायकली मुरूड समुद्र किनारी पर्यटकांसाठी आणल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी चार सायकली आणल्या असून मागणी वाढल्यास सायकलींची संख्या वाढविण्यात येणार आहे. मुरूड किनारी या सायलचा राउंड पर्यटक आवर्जून घेत आहेत. एका राऊंडचे शंभर रुपये आकारण्यात येतात. दोन व्यक्तींना ते परवडत असल्याने या सायकलस्वारीचा आनंद पर्यटक लूटत आहेत.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने चंद्रकांत पवार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले मी, अलिबाग समुद्रकिनारी या सायकली पहिल्या व तेव्हाच ठरवले की मुरूड समुद्र किनारीसुद्धा या सायकली आणायच्या. त्याप्रमाणे मी या सायकली आणल्या आहेत. शनिवार-रविवारी मुरूड किनारी असंख्य पर्यटक असतात. त्या वेळी या सायकलींना खूप मागणी असून चांगला व्यवसाय होत आहे.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper