पनवेल : रामप्रहर वृत्त
विहिघर येथे ओम साई दोस्ती क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2020 आणि कुंडेवहाळ येथे निकेश वास्कर स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे उरण, पनवेल आमदार चषक आणि सरपंच चषक 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर, सुनील पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper