Breaking News

जुन्या इमारतींची संरचना तपासणी

 नवी मुंबईत गृहसंकुलांकडून टाळाटाळ होत असल्याने पालिकेचा निर्णय

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नेरूळ येथील जम्मी पार्क इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने आता शहरातील जुन्या 30 वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींची संरचना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींची संरचना तपासणी करावी, असे गृहसंकुलांना सांगूनही ती होत नसल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेतला असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

दरवर्षी नवी मुंबई महापालिकेडून जुन्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आवाहन करण्यात येते, मात्र याकडे काही गृहसंकुलांकडून पाठ फिरवली जाते. त्यामुळे पावसाळ्यात स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे सिडकोकडून शहरातील 30 वर्षे जुन्या इमारतींची माहिती पालिकेने मागितली आहे.

नवी मुंबईत सिडकोनिर्मित अनेक धोकादायक इमारतींचा पुनर्बांधणी प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहे. वाशी, नेरूळ इत्यादी ठिकाणी 30 वर्षे जुन्या सिडकोनिर्मित इमारती आहेत, मात्र काही इमारतींचे आयुर्मान संपले असून मोडकळीस, जीर्ण झालेल्या आहेत. संक्रमण शिबिरांअभावी अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

धोकादायक इमारतीत वास्तव्य करणे जिकिरीचे आहे, मात्र तरीदेखील त्यामध्ये धोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत.

परीक्षणासंदर्भात आवाहन

वर्षानुवर्षे महापालिका शहरातील इमारतींना संरचनात्मक परीक्षण करण्याचे आवाहन करत आहे, मात्र अनेक इमारती संरचनात्मक परीक्षण करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका सिडकोकडून स्वतः शहरातील 30 वर्षे जुन्या इमारतींची माहिती घेण्यात येणार असून त्यांची संरचनात्मक परीक्षण करून घेण्यात येणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply