Breaking News

छत्र्या कारागीरांवर आली उपासमारीची वेळ

उरण : वार्ताहर

मुसळधार पाऊस सुरू झाला की, छत्री रेनकोट आदींच्या वस्तूंची खरेदी व दुरुस्ती हे दर वर्षाचे आहेच. दोन दिवस सतत मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू असल्याने छत्री दुरुस्त कारागीर दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. असे असले तरी सद्या जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यापेक्षा नवीन छत्री घेणार्‍यांचा कल असल्याने छत्री कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उरणमध्ये राजपाल नाका, आनंद नगर, गांधी चौक, राजपाल नाका, मंगल जनरल स्टोअर समोर, गांधी चौक आदी ठिकाणी कारागीर मग्न झाले आहेत. उरण तालुका सह सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपले. आठ महिने अडगळी ठिकाणी ठेवलेली छत्री पाऊस सुरू झाला की, आपल्यांना आठवण येते. ती शोधून वापरण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. त्यातच ती नादुरुस्त मिळाली तर मग कारागीराकडे जा दुरुस्त करून घ्यावी लागते, अशी परिस्थिती सर्वत्र दिसत असते.

रेनकोटमुळे छत्री वापरणे कमी झाले आहे. छत्री दुरुस्त करण्याचे दर कमी असून तार बसविणे 10 रुपये, मुठ बसविणे 30 रुपये असे दर असतांनाही सध्या आजकाल छत्री दुरुस्त करणे कमी झाले आहे. चायनाच्या स्वस्त छत्र्या बाजारात उपलब्ध झाल्याने युस अ‍ॅण्ड थ्रो झाल्याने छत्री दुरुस्तीचे काम कमी झाले आहे. वर्षातून एकदाच पैसे मिळतात, परंतु ते ही कमी झाले आहे त्यामुळे आम्हा कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे कारागीर राजा वाघरी यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply