Breaking News

रसायनीत स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे वृक्षारोपण

मोहोपाडा : प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँकेने, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा या उद्देशाने विविध प्रकारच्या रोपांचे ठिकठिकाणी वाटप केले.

एस. बी. आय बँकेच्या वर्धापनादिनानिमित्त या वेळी बँक सजवण्यात आली होती. ग्राहकांना मिठाई पॅकेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तर शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. स्टेट बँक आवारात आंबा, काजू, तुळस, चिकू अंजीर, असे विविध प्रकारचे झाडे व औषधी वनस्पतीचे रोपे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रबंधक अस्मिता चव्हाण यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. परिसरातील इस्रो कंपनी, रायगड जिल्हा परिषद शाळा मोहपाडा, रसायनी पोलीस ठाणे, संपूर्ण रेगे हॉस्पिटल, या ठिकाणी विविध रोपांचे वाटप करण्यात आले. शिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात विविध रोपे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

एस. बी. आयच्या रसायनी शाखेच्या प्रबंधक अस्मिता चव्हाण, बँक कर्मचारी राधा सुरेश, मनोहर थापा, मृणाल साखरे, विपिन सचदेव, अविनाश बुरबुरे, अंजली मेश्राम, संजय जाधव, चंद्रकांत कावळे, ग्राहक प्रतिनिधी प्रकाश गायकवाड, भरत चाळके, नरसिंग बिरादार आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply