Thursday , March 23 2023
Breaking News

जेव्हा कृणाल पांड्या ‘मंकडिंग’ची हुल देतो

चंदिगड : वृत्तसंस्था

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला ‘मंकड’ पद्धतीने धावबाद केले. यानंतर अश्विनची कृती योग्य की अयोग्य याबद्दल अनेक चर्चांना उधाण आले. शनिवारी (दि. 30) मुंबईविरुद्धच्या सामन्यातही पंजाबचा एक फलंदाज अशाच ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद होता होता राहिला.

मुंबईचा फिरकीपटू कृणाल पांड्या दहाव्या षटकात गोलंदाजी करीत असताना मयांक अग्रवाल धाव घेण्याच्या तयारीत होता. त्या वेळी पांड्याने मध्येच थांबत अग्रवालला बाद करण्याची हुल दिली. या प्रकारानंतर मैदानात उपस्थित खेळाडूंच्या चेहर्‍यावर हसू आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माला 12 लाखांचा दंड दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर 12 लाखांचा दंड भरावा लागला. मोहालीत झालेल्या या सामन्यात यजमान पंजाबने 8 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात षटकांचा वेग न राखल्याने रोहितवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply