पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त चोळई येथे आमदार प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि. 5) भेट देऊन पाहणी केली. या भागात तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदारद्वयीने दिले तसेच येथील स्थानिक नागरिकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सर्वार्थ मदत करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शेलार यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात महाड येथे बैठक करण्याचे निश्चित केले, तर पोलादपूर विश्रामगृहामध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांसोबत चर्चा केली.
आमदार प्रवीण दरेकर यांच्यासमवेत भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, पोलादपूर शहराध्यक्ष राजाभाऊ दिक्षित, नगरसेविका अंकिता निकम, राजन धुमाळ, एकनाथ कासुर्डे, समाधान शेठ, नामदेव शिंदे, बिपिन महामुणकर, महेश शिंदे, राजेश मपारा, संजय अप्पा ढवळे, संदीप ठोंबरे आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार भरत गोगावले यांनी जि. प.चे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे आणि पदाधिकार्यांसमवेत आमदार प्रवीण दरेकर यांची शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …