Breaking News

रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग वाढविण्याचे महत्व

डीझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढविण्यासाठी सध्या भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. देशात रेल्वे मार्गांचे वेगाने होणारे विद्युतीकरण हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. 2030 पर्यंत रेल्वे 100 टक्के हरित उर्जेवर चालविणे, असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने घेतले असून त्याची तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचे दिसते आहे.

भारताचे आर्थिक गणित बिघडवणारा सर्वात मोठा घटक कोणता असेल तर तो इंधनाचा. आपल्याला 85 टक्के इंधन आयात करावे लागते. त्यासाठी जे डॉलर खर्च करावे लागतात, त्यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण होते. इंधनाचे दर वाढले की अर्थव्यवस्थेतील इतर घटक चांगले काम करत असतानाही त्याचा फटका बसतो. हा धक्का कमी करण्याचा एक खात्रीचा मार्ग म्हणजे इंधनाचा वापर कमी करून विजेचा आणि त्यातही हरित उर्जेचा वापर वाढवत रहाणे. सोलर पार्कच्या मार्गाने देश त्यासंबंधीची मोठी तयारी सध्या करतो आहे. डिझेलचा मोठा वापर करणारी भारतीय रेल्वे या संदर्भाने काय करते आहे, हे जाणून घेतले पाहिजे.

रेल्वेचा डीझेल वापर अधिक

दररोज अडीच कोटी प्रवासी, 13 हजार दररोज धावणार्‍या गाड्या, 68 हजार किलोमीटर लांबीचे मार्ग आणि 33 दशलक्ष टन दररोजची मालवाहतूक करणार्‍या भारतीय रेल्वेला लागणारे डीझेल किती असू शकते, याचीकल्पना करा. अर्थातच कार्बन उत्सर्जन करण्यामध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. ते कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डीझेल इंजिनाऐवजीइलेक्ट्रीकल इंजिनांची संख्या वाढविणे. त्यासाठी अधिकाधिक रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करणे. हा बदल भारताच्या दृष्टीने महागडा आहे. मात्र त्याची निकड लक्षात घेता सरकारने त्यावर लक्ष केंद्रित केले असून रेल्वे विद्युतीकरणाचा वेग गेल्या काही दिवसात चांगलाच वाढला आहे.

कोकण मार्ग 100 टक्के विजेवर

गेल्या काही दिवसात आपल्या आजूबाजूला हा बदल दिसू लागला आहे. उदा. मुंबईतेकोल्हापूररेल्वे आता विजेवर धावू लागली आहे तर कोकण रेल्वे 100 टक्के विजेवर धावते आहे.(741 किलोमीटर- रोहा ते कर्नाटकातील थोकूर) देशभरातील अनेक मार्गांवरविद्युतीकरण पूर्ण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याचाच अर्थ असा की या कामाने आता वेग घेतला आहे. त्याची प्रचीती पुढील आकडेवारीही देते. उदा. 2000 मध्ये 56.1 टक्के प्रवासी वाहतूक डिझेल इंजिनांनी होत होती, ते प्रमाण 2020 मध्ये 43 टक्क्यांवर आले आहे. म्हणजे विजेच्या इंजिनांचा वापर याच काळात 43.9 वरून 57 टक्के झाला आहे. मालवाहतुकीत हा बदल अधिक झालेला दिसतो. गेल्या 20 वर्षांत डीझेल इंजीनांचा वापर 43.5 वरून 35.3 टक्के इतका कमी झाला आहे, तर विजेच्या इंजिनांचा वापर 56.5 वरून 64.7 टक्के इतका वाढला आहे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने घेतले आहे.त्यातील प्रमुख मार्ग डिसेंबर 2023 पर्यंतच पूर्ण केले जाणार आहेत.याचा अर्थ पुढील काळात रेल्वेत विजेचा वापर आणखी वेगाने वाढणार आहे.

रेल्वेच्याजागांवर सौर पार्क

मग प्रश्न असा उपस्थित होतो की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागणारी वीज आणणार कोठून?2020 मध्ये रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वेने 18 हजार 410 दशलक्ष युनिटतर स्थानकांवर तसेच इतर कारणांसाठी दोनहजार 338 दशलक्ष युनिट वीज वापरली.विजेची निर्मिती कोळश्यापासूनच होत राहिली आणि तीच वीज रेल्वे वापरत असेल तर कार्बन उत्सर्जन आणखी वाढणार.कारण सध्या तर आपली वीज कोळश्यापासूनच अधिक येते. यावर उपाय म्हणून रेल्वेने सौर उर्जा पार्कचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून त्याच विजेवर रेल्वेचा पुढील काळात भर राहणार आहे. रेल्वेची स्थानके, कारशेड्स आणि रेल्वे मार्ग अशी प्रचंड जागा रेल्वेकडे आहे. त्या जागेचा वापर सौरपार्कसाठी केला जाणार आहे.तब्बल 960 स्थानकांवर सौर पॅनेलबसविण्याचे काम सध्या सुरु आहे. दिल्लीजवळीलसाहिबाबाद आणि चेन्नई रेल्वे स्थानक ही त्याची मोठीउदाहरणे आहेत.ही वीज रेल्वे स्थानकातच वापरली जाणार आहे. मध्यप्रदेशातील बिना येथे रेल्वेने भेलशीकरार करून 1.7 मेगावॉटचा सौर उर्जा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज थेट रेल्वे ओव्हरहेडमध्ये टाकली जाते. हेतंत्रज्ञान केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रथमच वापरले जाते आहे.

विद्युतीकरणाच्या कामाला वेग

रेल्वेचे विद्युतीकरण किती वेगाने होते आहे, याचीआणखी काही आकडेवारी पाहण्यासारखी आहे.2020 पूर्वीच्या तीन वर्षांत याकामावर 20 हजार 260 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे70 टक्के ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण याकाळात पूर्ण झाले आहे. सध्या एकूण 45 हजार 881 किलोमीटर मार्गांचेविद्युतीकरण झाले आहे. त्यातील सहा हजार 15 किलोमीटर 2020-21मध्ये, चार हजार 87 किलोमीटर 17-18 मध्ये, तर 5 हजार 276 किलोमीटर 18-19 मध्ये तर चार हजार 378 किलोमीटर 19-20 मध्ये पूर्ण झाले आहे. यावरून या कामांच्या वेगाची कल्पना येते.

विजेच्या इंजिनांचे अनेक फायदे

कार्बनउत्सर्जन कमी होते म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होते, याशिवाय विजेची इंजिन वापरण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. उदा.डीझेलचावापर कमी झाल्याने देशाचे आयात बीलकमी होते. विजेच्या इंजिनांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक वेगाने होते.डीझेल इंजिनांची देखभाल करण्यासाठी जेवढा खर्च लागतो, त्याच्या निम्म्याच खर्चात विजेच्या इंजिनांची देखभाल होते.स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवाचे औचित्य साधून 2023 च्या स्वातंत्र्यदिनी75वंदे भारत गाड्या चालविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. अशा अत्याधुनिक आणि वेगवान गाड्या चालविणे विजेच्या इंजिनांमुळेच शक्य होते.

-यमाजी मालकर, अर्थप्रहर

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply