नगरपरिषदेची धडक मोहीम
उरण : वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.19) राजपाल नाका येथे नगरपरिषदेने तोंडाला मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. उरण नगर परिषदेने धडक कारवाई करत विनामास्क फिरणार्या 24 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.सुमारे 12 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
उरण शहरात तोंडाला मास्क न लावता मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या फैलावाचे भान विसरून फिरणार्या काही नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये एवढी दंडाची आकारणी करण्यात आली आहे. या मोहिमेत उरण नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचार्यांसह पोलिसांचाही सहभाग असल्यानेही मास्क न लावणार्यांवर कारवाई करणे सुलभ बनले आहे.
या मोहिमेत उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी, जगदीश म्हात्रे, धनेश कासारे, राकेश कामेटकर, महेंद्र साळवी, नरेंद्र उभारे, प्रमोद मटकर, हरेश जाधव, अनिल कासारे, वसंत पाटील, चेतन गिरी, सचिन नांदगावकर, विनोद गायकवाड, आकाश कवडे, पोलीस हवालदार एस. के. भाट, पोलीस नाईक, पोलीस नाईक तिवडे, पोलीस नाईक पाटील, युवराज जाधव, रामधन पठ्ठे, सचिन भगत आदी उपस्थित होते. ही मोहीम उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तो कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुज्ञ व्हावे, नागरिकांनी मास्कचा वापर करावा. सॅनिटायझरचा वापर करावा. स्वच्छता पाळावी. सुरक्षित अंतर पाळावे. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे.
-संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद