Breaking News

नवी मुंबईत होणार फ्लेमिंगो बर्ड वॉच टॉवर

भाजप माजी नगरसेवकाच्या पाठपुराव्याला यश

नवी मुंबई : बातमीदार

फ्लेमिंगो व पक्षी प्रेमी व पक्षी अभ्यासकांसाठी नवी मुंबई पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पक्षी प्रेमी व निरोक्षकांना सहज आपल्या आवडत्या फ्लेमिंगो पक्ष्याचे निरीक्षण करता यावे, न्याहाळता यावे यासाठी फ्लेमिंगो बर्ड वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. फ्लेमिंगो बर्ड वॉच टॉवरसाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत, मात्र पालिकेला वन विभाग व एमसीझेडएमएची परवानगीदेखील आवश्यक असणार आहे.

नवी मुंबई शहराला समृद्ध खाडी किनारा लाभला आहे. खाडी किनार्‍याजवळ रहिवाशी भाग क्वचित असल्याने कांदळवनांनी वेढलेले आहे. या कांदळवनांमुळे नवी मुंबई खाडीत जैवविविधता टिकून आहे. त्याचा परिणामा म्हणजे जगात आपल्या रंगामुळे दौलदार रचनेमुळे सर्वत्र प्रसिद्ध व आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरलेले फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईच्या खाडी किनार्‍यावर येणे पसंत करत आहेत. अजतागायात या जागतिक दर्जाच्या पक्ष्यांकडे नवी मुंबई पालिकेने दुर्लक्षच केले होते. हा समृद्ध वारसा टिकावा व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी शासन सतरावर उदासीनता दिसून आली होती.

नवी मुंबई शहराने विकासाची झेप घेतल्यावर मात्र इथे राहण्यास आलेल्या नागरिकांकडून व काही पर्यावरणवादी संस्थांकडून मात्र फ्लेमिंगो संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. त्यास भूमिपुत्रांची साथ मिळाली, मात्र पालिका स्तरावर हे काम होणे गरजेचे होते. 1992 साली पालिकेची स्थापना झाल्यावर तब्बल 30 वर्षांनी फ्लेमिंगोंचे महत्व पालिकेला पाटल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण प्रेमी असलेले आयुक्ता अभिजित बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षणाचा आधार घेत संपूर्ण शहरातच फ्लेमिंगो सिटीची कल्पना राबवली. त्यातून शहरात सर्वत्र फ्लेमिंगोबाबत  जनजागृती आहे. एकाएकी नवी मुंबई शहर हे फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. एकीकडे वन विभागाकडून ऐरोली ठाणे खाडीत फ्लेमिंगो सफारी सुरु करण्यात आली आहे तर दुसरीकडे त्याच नवी मुंबईचा भाग असलेल्या नेरुळ टी एस चाणक्य व एन आर आय गृह संकुला शेजारी असलेल्या पाणथळ जागेबाबत मात्र कोणतेही पाऊल उचलण्यात आले नव्हते.

याची खंत पर्यावरणवादी संस्था करत आल्या आहेत. एकीकडे नवी मुंबईत पालिका एकही पर्यटन स्थळ निर्माण करू शकलेली नाही. त्यात फ्लेमिंगो संवर्धनाबाबतचे वास्तववादी चित्र व झालेले दुर्लक्ष लक्षात घेत आयुक्त बांगर यांनी फ्लेमिंगो सारख्या दुर्लक्षित राहिलेल्या विषयाला महत्त्व प्राप्त करून दिले आहे.

मात्र यापुढच्या काळात नवी मुंबई पालिकेला ही ओळख जपावी लागणार आहे. पर्यावरण वादी संस्था म्हणून आम्ही देखील पालिकेला साथ देण्यास तयार रुग्णालय पर्यावरण संस्था नातकनेक्त फाउंडेशन चे अध्यक्ष बी. एन. कुमार यांनी सांगितले.  त्यामुळे बर्ड वॉच टॉवर उभारण्याचे उचललेले पुढे हे फ्लेमिंगो संवर्धनासाठी स्वागतार्ह मानले जात् असून; पाणथळ जागा नष्ट करणार्‍यांवर देखील केले ठेवणे सोपे जाणार आहे. माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी टी एस चाणक्य येथे फ्लेमिंगो वॉच टॉवर उभारावा अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार टी एस चाणक्य येथे वॉच टॉवर उभारण्यास अय्युक्तांनी पूर्ण दर्शवली आहे. त्याबाबत पालिकेने निविदा देखील मागवली आहे. पक्षी प्रेमींसाठी ही आनंदाची बाब असणार आहे. त्यांना जवळून पक्षी न्याहाळता येणार आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या जवळ जाऊन त्यांना त्रासदायक ठरणार्‍या मानवी कृत्यातून पक्ष्यांची सुटका होणार आहे. म्हात्रे यांच्या मागणीनुसार टी एस चाणक्य ते एन आर आय असा जोडणारा अंतर्गत मार्ग व टि. एस. चाणक्य जेटी पर्यंत देखील रस्ता तयार करण्यात येणार आहे.

करावे गावालगत टि. एस. चाणक्य ते एन. आर. आय कॉम्पलेक्स सर्व्हीस रस्ता तयार करणे, टि. एस. चाणक्यच्या संरक्षक भिंती मागील रस्ता टि. एस. चाणक्य जेटी पर्यंत तयार करणे, टि. एस. चाणक्य ते एन. आर. आय कॉम्पलेक्समधील मिठागराच्या पाणथळ जागेत येणारे फ्लेमिंगो पक्षी व इतर विविध पक्षी निरिक्षण व पाहण्यासाठी टेहळणी टॉवर उभारणे. दशक्रिया विधीसाठी अजतागयत् अधिकृत शेड उभारण्यात आली नव्हती टी तयार करण्यात येणार आहे. अशा विविध मागण्या केल्या होत्या त्यास यश आले आहे.

-विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक, भाजप

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply