Breaking News

कोशिश फाउंडेशनतर्फे ‘सूर पनवेलचा’ रंगतोय!

प्रातःकालीन मैफिलीस वाढता प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोशिश फाउंडेशनतर्फे वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 1) झालेल्या सूर पनवेलचा या कार्यक्रमाच्या 25व्या भागास संगीतप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होते.
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनतर्फे आयोजित सूर पनवेलचा हा प्रातःकालीन मैफिलीचा कार्यक्रम दर शनिवारी वडाळे तलाव येथे होत असतो. त्यास पनवेलकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या 25व्या भागात खारघर येथील गायिका मनाली गर्गे-कुलकर्णी यांच्या सुमधूर आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पनवेलचे युवा वाद्य कलाकार आदित्य उपाध्ये यांनी तबल्यावर, तर सिद्धार्थ जोशी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथ दिली.
या वेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले, तर मान्यवरांच्या हस्ते गायक, कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, गणेश जगताप, अक्षया चितळे, चंद्रकांत ताम्हणकर, रोहित अटवणे, विजय पाटील, मनोहर लिमये आदी उपस्थित होते.
पनवेलमध्ये अशा सुरेल प्रातःकालीन मैफिली होत आहेत आणि लोक उत्तम प्रतिसाद देत आहेत. यातून आपले शास्त्रीय संगीत पुढे जाईल आणि पनवेल व आसपासच्या परिसरातील कलाकार पुढे येतील यात शंका नाही, असे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
दर शनिवारी पनवेलकर रसिकांना सूर पनवेलचा उत्तम संगीत पर्वणी असून त्यास प्रतिसाद वाढत आहे. या कार्यक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी 9769409194 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सांस्कृतिक कट्टा या नावाने सेव्ह करून व्हॉट्सअ‍ॅपवर ‘हाय’ पाठवावे. म्हणजे आपल्याला या कार्यक्रमासह पनवेल महापालिका क्षेत्रात होणार्‍या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती निःशुल्क पोहचवली जाईल, असे आवाहन या वेळी अभिषेक पटवर्धन यांनी केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply