Breaking News

ऑनलाइन मखर, पूजापाठ साहित्याला ग्राहकांची पसंती

पेण ः प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी काही दिवसांत विराजमान होणार्‍या गणरायाच्या स्वागतासाठी भक्तगणांत उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती असून दुकानदारांनी घरपोच सेवाही सुरू केली आहे.   गणरायाच्या सजावटीसाठी ऑनलाइन मखरविक्री होत असून याबरोबर गणेशपूजनासाठी धूप, अगरबत्ती, दिवे, माळा असे अनेक साहित्यही मिळत असल्याने अनेक ग्राहकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे वाढत चालला आहे. त्यामुळे गर्दी कमी होऊन कोरोना आटोक्यात आणण्यासही मदत होऊ शकते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply