Breaking News

खारघर-बेलपाडा अंडरपासची दुरवस्था

भाजप पदाधिकार्‍यांचा सिडकोकडे पाठपुरावा

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर रेल्वे स्थानकातून बेलपाडा गाव, तसेच खारघरमधील सेक्टर 5, 6 उत्सव चौक मार्गे सेक्टर 21 व टाटा कॅन्सर हॉस्पिटल व पुढे तळोजाकडे जाणारी वाहने यांना जाण्यासाठी अंडरपासची सुविधा सिडकोकडून देण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ह्या अंडरपासची दुरवस्था होत असते, म्हणून भाजप पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा केला आहे.

दरवर्षी या अंडरपासमध्ये पाणी साचते व रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून पाणी भरते. नेहमीप्रमाणे सिडको थातुरमाथुर मलमपट्टी करते, पण ठोस उपाय करीत नाही. पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात.प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होते. सिडकोचे सर्व अधिकारी हे सारे जाणतात, पण कायमस्वरुपी उपाययोजना करीत नसल्याने दर पावसाळ्यात हा मार्ग मृत्यूचा सापळा बनून राहिला आहे.

या मार्गासाठी कायम स्वरुपी उपाय करुन जनतेला होणार्‍या त्रासापासून मुक्त करा, या साठी सिडको कार्यकारी अभियंता श्री रघुवंशी यांना भाजप खारघर मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल व प्रभाग क्रमांक 5 चे माजी नगरसेवक शत्रुघ्न काकड़े यांनी निवेदन दिले. या वेळी भाजप कार्यकर्ता विपुल चोटलिया, कृष्णा खडगी उपस्थित होते.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply